Jalgaon DCC Bank Bharti : जळगाव जिल्ह्यातील तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात Jalgaon DCC Bank मध्ये तब्बल 220 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून जे तरुण बँकेत किंवा चांगली नोकरी शोधत होते त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी मानली जात असून, अर्ज प्रक्रिया १९ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
तरुणांनी अर्ज व जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
भरतीची माहिती 👇
या भरतीत लिपिक (सपोर्ट स्टाफ) या पदासाठी जागा उपलब्ध असून, एकूण 220 पदांवर ही नियुक्ती होणार आहे. ग्रामीण भागातील अनेक युवक या बँकेत नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहतात आणि त्यामुळे या भरतीला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
शैक्षणिक पात्रतेबाबत बोलायचं झालं तर उमेदवारांकडे कोणत्याही शाखेची पदवी (Graduation) किमान ५०% गुणांसह असावी. त्यासोबतच MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स अनिवार्य आहे. म्हणजेच, ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेज पूर्ण केलं आहे आणि संगणकाचं बेसिक ज्ञान घेतलं आहे, त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे.
तरुणांनी अर्ज व जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
Age limit :
वयोमर्यादा देखील बऱ्यापैकी सरळ आहे उमेदवाराचं वय २१ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावं. परीक्षा फी ₹१००० ठेवण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे, त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरूनच आपले फॉर्म भरावेत.
निवड प्रक्रिया :
या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला १ वर्षाचा परिविक्षाधीन कालावधी (Probation Period) राहील. या काळात उमेदवारांना दरमहा ₹१३,००० संकलित पगार दिला जाईल. त्यानंतर कामगिरीनुसार नियमित नियुक्ती केली जाईल.
जळगाव जिल्ह्यातील सहकारी बँका हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचं महत्त्वाचं केंद्र आहे. गावागावात कर्ज, बचत आणि शेतकऱ्यांच्या व्यवहारासाठी या बँकांचं योगदान मोठं आहे. त्यामुळे या संस्थेत नोकरी मिळणं म्हणजे केवळ रोजगार नव्हे, तर समाजसेवेची संधी देखील आहे.
स्थानिक पातळीवर अनेक तरुण या नोकरीसाठी तयारी करत आहेत. बँकेत नोकरी म्हणजे स्थैर्य आणि सन्मानाचं काम आहे. आता ही संधी मिळाली तर आयुष्य सावरून जाईल असं सांगतात चोपड्याजवळचे उमेदवार रोशन पाटील.
भरतीची सर्व माहिती आणि ऑनलाईन अर्जाची लिंक बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे
ज्यांना स्थिर नोकरी हवी आहे आणि बँक क्षेत्रात करिअर करायचं आहे, त्यांच्यासाठी ही भरती म्हणजे एकदम सोन्याची संधी आहे. उशीर न लावता फॉर्म भरा, कारण शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२५ आहे.
(Disclaimer : अर्ज करण्यापूर्वी तरुणांनी संबंधित जाहिरात व भरतीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे भरती बाबत कुठलीही फसवीगिरी झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही)
