चांदीच्या दरात तीस हजारांची, तर सोन्याच्या दरात 8,500 रुपयांची मोठी घसरण, एकदा नवीन दर पहाच

Gold Silver Rate | सर्वत्र आनंदाचे महोत्सव सुरू आहे, दिवाळीत हा सर्वात मोठा सण सर्वांसाठी आनंद घेऊन येत असतो. देशभरामध्ये दिवाळी सन मोठ्या जल्लोसात साजरा केला जातो. इकडे आनंदाचं वातावरण असते बाजारात गर्दी असते. कुणी कपडे खरेदी करतात, कुणी गाडी घेतात, तर कुणी जमीन जुमला, तर कोणी सोन खरेदी करतात. त्याच दिवाळीच्या तोंडावरती 16 खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. जे भाव आकाशाला भिडलेले होते ते आता घसरलेले आहेत. 24 ऑक्टोबर च्या शुक्रवारी बाजारात किमती कोसळल्या. तर आजच्या दिवशी चांदीच्या भावात 3700 ने घसरण झाली, तर सोन्याच्या दरात 935 घसरण झाली. आता सोन ऑल टाईम हाय पासून तब्बल 8,455 खाली आला आहे आणि चांदीचे अवस्था अजून वाईट आहे. दहा दिवसात तब्बल तीस हजार तीनशे पन्नास प्रति किलोने घसरण झाली आहे.Gold Silver Rate


काही नागरक म्हणत आहेत, सोना चांदी म्हणजे सुरक्षित गुंतवणूक, पण सध्या बाजारातील चित्र वेगळच निर्माण झाल आहे. IBJA (इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन) ने दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्या 24 कॅरेट सोन्याचा दर जीएसटी सह एक लाख 26 हजार 91 प्रति दहा ग्रॅम झाला आहे, तर जी चांदी जीएसटीचा एक लाख 52,182 प्रति किलो वर पोहोचली आहे. 14 ऑक्टोबरला चांदी एक लाख 82 532 वर होते आणि ती थेट आता तीस हजारांनी खाली आली आहे. एवढ्या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड गोंधळ उडालेला आहे.

IBJA नुसार काल म्हणजे 24 ऑक्टोबरला सोनं ₹1,23, 354 वर बंद झालं होतं, पण आज सकाळी बाजार उघडतात तेव्हा एक लाख 22,419 वर आलं. चांदी ही काल एक लाख 51,450 वर होती आणि आज थेट ₹1,47,750 वर घसरली. म्हणजे एकाच दिवसात दोन्ही धातुनी हजारोंच्या घसरणीचा धक्का दिला.

कॅरेटनुसार पाहिलं तर

23 कॅरेट सोनं आज ₹934 नी स्वस्त झालं आणि आता त्याचा दर ₹1,21,926 प्रति 10 ग्रॅम आहे. जीएसटीसह हे ₹1,25,583 होतं.

22 कॅरेट सोनं ₹856 नी कमी होऊन ₹1,12,136 प्रति 10 ग्रॅमवर आलं असून, जीएसटी जोडल्यावर दर ₹1,15,500 झाला आहे.

18 कॅरेट सोन्याचाही दर ₹702 नी कमी झाला आणि तो आता ₹91,814 प्रति 10 ग्रॅम आहे, जीएसटीसह ₹94,568 पर्यंत पोहोचला.

असं असलं तरी, जर वर्षभराचं चित्र पाहिलं तर सोनं या वर्षात अजूनही एकूण ₹46,679 नी महाग झालं आहे आणि चांदी ₹61,733 प्रति किलो वाढली आहे. म्हणजे सध्याची घसरण तात्पुरती असू शकते, पण गुंतवणूकदारांची धडधड मात्र वाढली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत होत असल्याने आणि जागतिक मागणीत घट आल्याने सोने-चांदीवर दबाव वाढतोय. त्यात शेअर बाजार पुन्हा तेजीत आल्याने गुंतवणूकदारांनी सोन्यातील पैसा काढून शेअर्सकडे वळवला आहे. त्यामुळेच दर दिवसेंदिवस सराफा बाजारात मंदीचं वातावरण वाढतंय.

( Disclaimer : वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही. योग्य सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी आपल्या जवळच्या सराफ दुकानाशी संपर्क साधा.)

Leave a Comment

error: Content is protected !!