या शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार नाही pm Kisan योजनेचे ₹6000 रुपये तुमचे यादीत नाव आहे का चेक करा

Beneficiary Status | दिवाळीचा सण सर्व देशभरामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी साजरा केला आहे. परंतु आता अशाच शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची आणि टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे काय ठराविक शेतकऱ्यांच्या खात्यावरती यापुढे आता पीएम किसान (Pm Kisan Yojana) योजनेचे सहा हजार(₹6000) रुपये येणार नाही त्यासाठी तुमच यादी मध्ये नाव आहे का? याचे नेमके कारण काय त्यासाठी ही बातमी सविस्तर वाचा. Beneficiary Status


शासनाच्या माध्यमातून दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये येणार अशी बातमी सर्व प्रसार माध्यमांमध्ये वायरल झाली होती. दिवाळी संपली पण शेतकरी अजून आतुरतेने वाटच पाहत आहे. अजून देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसन योजनेचा हप्ता जमा झालेला नाही. त्याचपूर्वी शेतकऱ्यांना आणखी टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलेली आहे.

खरंतर, पी एम किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठा आधार बनलेली आहे. दरवर्षी या योजनेतून शेतकऱ्यांना थेट सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. वर्षांमध्ये तीन समान हप्त्यांमध्ये दोन-दोन हजार रुपये करून ही रक्कम जमा केली जाते. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 20 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत आता यापुढे शेतकऱ्यांच्या नजर 21 वा हप्त्याकडे लागले आहे.

परंतु शेतकरी मित्रांनो सरकारने काही कडक नियम केलेले आहेत,  जर हे शेतकरी नियम पाळत नाहीत किंवा आवश्यक प्रक्रिया पूर्ण करत नाहीत, त्यांना पैसे मिळणार नाहीत. म्हणजेच ज्यांचं आधारकार्ड खात्याशी लिंक नाही,  ज्यांनी आतापर्यंत या योजनेची E KYC केली नाही किंवा ज्यांच्या जमीन कागदपत्रात गडबड आहे, त्यांना या योजनेचा हप्ता मिळणार नाही.

सध्या अनेक ठिकाणी पैसे आले आहेत तर दुसऱ्याचं खातं Pending असं दाखवते. मग तो शेतकरी बँकेत जातो, शेतू केंद्रात जातो, पण तरी आता थांबलेलाच असतो. कारण आता सरकारं DBT प्रणाली अधिक कडक केलेले आहे. जर तुमचा आधार कार्ड आणि बँक खाते योग्यरित्या लिंक असेल तर थेट तुमच्या खात्यामध्ये रक्कम येणार नाही.

E KYC ही सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया आहे. अनेक शेतकऱ्यांनी ती अजून पूर्ण केलेली नाही, त्यामुळे त्यांच्या नावाजवळ हप्ता थांबला असं दाखवत आहे. सरकारने स्पष्ट केला आहे की जोपर्यंत शेतकरी e KYC पूर्ण करत नाही तोपर्यंत त्यांच्या खात्यावरती पैसे पाठवले जाणार नाही.

तर काही शेतकऱ्यांनी त्यांच्या अर्जामध्ये भरपूर चुका केलेले आहे त्यामुळे काहींचा खाते क्रमांक चुकला किंवा IFSC कोड चुकला त्यामुळे सरकारचा सॉफ्टवेअर लगेच व्यवहार थांबवतोय. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी तातडीने आपल्या बँकेची किंवा कृषी कार्यालयाशी संपर्क साधून ही कामे दुरुस्त करून घ्यायचे आहेत.

अजून एक गोष्ट म्हणजे काहीजणांनी आपली गैर शेती जमीन दाखवली आहे किंवा दुसऱ्याच्या नावावर जमीन आपल्या नावावर दाखवली. असे अर्ज सरकार रद्द करत आणि त्यांचे पुढील हप्त थांबवतात. पण चूक दुरुस्त करून पुन्हा नाव यादीत घेता येतात.

तुमचे नाव यादीमध्ये आहे का (Beneficiary list of PM Kisan Yojana)

लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे पाहण्यासाठी तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावा लागेल. तिथे गेल्यानंतर तुम्हाला Beneficiary Status असा पर्याय दिसेल त्यावर ती क्लिक करा. त्यानंतर आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाका. जर Approved दाखवत असेल तर अभिनंदन पुढचा हप्ता तुमच्या खात्यावरील. पण जर Pending किंवा Hold असं दाखवत असेल तर समजा काही प्रक्रिया बाकी आहे.

जर तुमचा हप्ता थांबवला असेल तर कात्रीने जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जाऊन संपूर्ण माहिती समजून झालेली चूक दुरुस्त करून घ्या बँक खाते योग्य जोडले आहे का तपासा कृषी विभागाच्या कार्यालयात भेट देऊन तुमची जमीन पडताळणी पूर्ण करून घ्या हे सगळं नीट केलं की तुमच्या खात्यावरती योग्यरित्या दोन हजार रुपये पुन्हा जमा होण्यास सुरुवात होईल.

(DISCLAIMER : वरील दिलेली माहिती किंवा माहिती करीत आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही शेतकरी बांधवांना योग्य माहिती आणि योग्य निर्णय घेण्यापूर्वी शासनाच्या अधिकृत घोषणाकडे वाट पाहावी.)

Leave a Comment

error: Content is protected !!