One Plus 15 News | स्मार्टफोन जगतात नवनवीन ट्रेंड आणणारी वनप्लस कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यंदा कंपनीनं एक भन्नाट निर्णय घेतला आहे त्यांनी OnePlus 14 हे नाव पूर्णपणे वगळून थेट OnePlus 15 नावाचं नवं मॉडेल बाजारात आणायचं ठरवलं आहे. आता अनेकांना प्रश्न पडतोय की १४ नंबरचं काय झालं? असं का केलं? तर याचं उत्तर चिनी संस्कृतीत लपलं आहे. One Plus 15 News
चीनमध्ये ४ हा अंक अशुभ मानला जातो. चिनी भाषेत ‘चार’ या शब्दाचा उच्चार ‘मृत्यू’ या शब्दासारखा वाटतो. त्यामुळे अनेक चिनी लोक घराच्या क्रमांकापासून ते उत्पादनांच्या नावांपर्यंत ४ हा अंक टाळतात. अशाच श्रद्धेमुळेच वनप्लसने १४ (ज्यात ४ येतोच) हा क्रमांक वापरणं टाळलं आहे. म्हणजेच अंधश्रद्धा आणि संस्कृतीचं मिश्रणच या निर्णयामागे दडलेलं आहे.
वनप्लसने असं पहिल्यांदाच केलं नाही. यापूर्वीही कंपनीनं OnePlus 3 नंतर थेट OnePlus 5 लाँच केलं होतं. त्यावेळीही ‘४’ अंकामुळे OnePlus 4 हे नाव टाळण्यात आलं होतं. म्हणजे आता ही परंपरा कायम ठेवत कंपनीने पुन्हा एकदा तोच मार्ग स्वीकारला आहे.
यात गंमत म्हणजे वनप्लसची सिस्टर कंपनी असलेली ओप्पोही असाच विचार करते. ओप्पोने आपल्या फोल्डेबल फोन मालिकेत Find N3 नंतर थेट Find N5 लाँच केला होता. मात्र काही ठिकाणी ओप्पोने Reno 14 सीरीजसुद्धा आणली होती. म्हणजे वेगवेगळ्या मॉडेल्ससाठी वेगवेगळे नियम लागू, पण वनप्लसनं ठामपणे १४ ला टाळलं आहे.
या सगळ्या प्रकारामुळे आता टेक जगतात चर्चा रंगली आहे की कंपनी पुढे १६ नंतर थेट १७वर जाणार का? की आता हे सगळं केवळ मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा भाग आहे? पण एक गोष्ट नक्की वनप्लसने पुन्हा एकदा लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता सगळ्यांचे डोळे ‘वनप्लस १५’ च्या लाँचकडे लागले आहेत, ज्यात नवे फीचर्स, झपाट्याने चार्ज होणारी बॅटरी आणि शक्तिशाली प्रोसेसर असण्याची चर्चा आधीच सुरु आहे.
