Gold Silver Rate Today | गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदी या दोन्ही धातूंच्या बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या आधी ज्या सोन्याने विक्रमी उंची गाठली होती, तेच आता थेट खाली कोसळताना पाहायला मिळत आहे. लोक म्हणतायत सोन्याचा भाव पुन्हा कमी होतोय, आता ही खरेदीची योग्य वेळ आली का?Gold Silver Rate Today
असं म्हणावं लागतंय कारण आज (२४ ऑक्टोबर) सोन्याच्या दरात तब्बल ₹२००० ची घसरण झाली आहे. आणि आपल्या सार्वकालिक उच्चांकापासून सोन्याचा भाव थेट ₹१०,००० नी कमी झाला आहे. ही घसरण पाहून अनेक सोन्याचे व्यापारी आणि खरेदीदार दोघेही विचारात पडले आहेत.
सध्या सोन्याचा दर किती आहे?
इंडियन बुलियन अँड ज्वेलरी असोसिएशन (IBJA) च्या माहितीनुसार, २४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत २४ कॅरेट सोन्याचा दर २३ ऑक्टोबरच्या तुलनेत सुमारे ₹२००० नी कमी होऊन ₹१,२१,५१८ प्रति १० ग्रॅम झाला आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव देखील सुमारे ₹१७०० नी घसरून ₹१,११,३१० प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे.
१८ कॅरेट सोनं आता ₹९१,१३९, तर १४ कॅरेट सोनं ₹७१,०८८ प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे.
दिवाळीच्या सुमारास जेव्हा सोन्याचा भाव ₹१,३२,२९४ प्रति १० ग्रॅम या उच्चांकावर पोहोचला होता, त्याच्यापेक्षा आता दर जवळपास ₹१०,००० ने खाली आले आहेत. म्हणजेच, सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ सुवर्णसंधी ठरू शकतो.
चांदीचाही दर कोसळला
फक्त सोनंच नाही, तर चांदीचाही भाव कोसळला आहे. आज (२४ ऑक्टोबर) चांदीचा दर थेट ₹४४०० नी घसरून ₹१,४७,०३३ प्रति किलो इतका झाला आहे. कालच्याच दिवशी हा दर ₹१,५१,४५० प्रति किलो होता. म्हणजे एका दिवसात मोठी घसरण झाली आहे.
एमसीएक्सवरही (Multi Commodity Exchange) पडझड
MCX (Multi Commodity Exchange) वरदेखील सोनं-चांदी दोन्हींचा बाजार मंदावला आहे. ५ डिसेंबरच्या करारासाठी चांदीचा दर ₹२८३४ नी कमी होऊन ₹१,४५,६७८ प्रति किलो झाला, तर सोनं ₹२१७१ नी घसरून ₹१,२१,९३३ प्रति १० ग्रॅम वर आले आहे.
जागतिक बाजाराचा परिणाम
तज्ञ सांगतात की सध्या जागतिक व्यापारातील स्थिरता, अमेरिका-चीन आणि भारत-अमेरिका यांच्यातील सुधारलेले आर्थिक संबंध यामुळे सोन्यातील गुंतवणुकीचं आकर्षण कमी झालं आहे. त्यामुळे भावात घसरण होत आहे.
पुढे काय?
१७ ऑक्टोबर रोजी सोन्याने आपल्या सर्वोच्च पातळीचा स्पर्श केला होता, पण आता तेथून तो थेट खाली आला आहे. चांदीदेखील आपल्या उच्चांकाच्या तुलनेत २५,००० रुपयांनी कमी झाली आहे.
आता प्रश्न असा आहे की हा भाव अजून कमी होणार का? अनेक ज्वेलर्स सांगतात की पुढील काही दिवस बाजार स्थिर राहू शकतो. मात्र, आंतरराष्ट्रीय परिस्थिती बदलली तर पुन्हा सोन्याचा भाव चढू शकतो.
म्हणून ज्यांना सोने खरेदी करायचं आहे, त्यांनी बाजाराचा नीट अभ्यास करून निर्णय घ्यावा. कारण अशा घसरणीच्या काळातच सोनं विकत घेणं फायदेशीर ठरू शकतं.
(Disclaimer: वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही. योग्य बाजार भाव जाणून घेण्यासाठी आपण आपल्या जवळच्या सराफ दुकानाशी संपर्क साधा.)
